…म्हणून ड्रग्ज लॉर्ड पाब्लो इस्कोबार ब्रिटनच्या सैनिकांच्या हातावर तुरी देऊन निसटला!

Pablo Escobar - Maharashtra Today

पाब्लो इस्कोबार… जगातला सर्वात मोठा कोकेन नावच्या ड्रग्जचा निर्माता. मॅडलीन ड्रग्ज कार्टेलचा सर्वेसर्वा. गुन्हेगारीच्या पुस्तकात त्यांची नोंद जगातला सर्वात श्रीमंत गँगस्टर म्हणून केलीये. पाब्लोनं जितक्या वेगात पैसा कमावला त्याच दुप्पट वेगानं त्यानं शत्रु निर्माण केले. त्यातल्या प्रत्येकाला पाब्लोला मरताना बघायची इच्छा होती.

जगातल्या सर्वात श्रीमंत डॉनचा सफाया करणं इतकी सोप्पी गोष्ट नव्हती. यासाठी जगातल्या सर्वात चालाख गुन्हेगारांची गरज होती; पण पाब्लो त्यांच्याही हाताला लागला नाही. पैसे घेवून हत्या करण्याऱ्या एका ब्रिटीश टीमनं १९८९ला पाब्लोच्या गुन्हेगारी इलाख्यात पाय ठेवला. पाब्लोची हत्या हेच त्यांच एकमेव ध्येय होतं.

जगातला सर्वात मोठा कोकेन उत्पादक आणि वितरक अशी त्याची ओळख होती. त्यावेळी जगभरातला ८० टक्के ड्रग्जचा व्यवसाय त्याच्या ताब्यात होता. पाब्लोला रस्त्यातून हटवून सारा धंदा स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी त्याच्या स्पर्धकांना पाब्लोचा जीव घ्यायचा होता. म्हणून ब्रिटीश वायू सेनेतील विशेष तुकडीतील माजी सैनिकाला या कामासाठी बोलवण्यात आलं होतं.

पाब्लोच्या विरोधी गँगमधल्या जॉर्ज सालसेडोनं ब्रिटीश अधिकारी मॅक्लॅज यांना पाब्लोला संपवण्याची सुपारी दिली होती. मॅक्लॅज यांना हत्या करण्याच प्रशिक्षण तर आर्मी ट्रेनिंगमध्येच मिळालं होतं. वयाच्या १७ व्या वर्षी ते ब्रिटीश सैन्यात भर्ती झाटीश सैन्याच्या पॅरेशुले होते. ब्रिटन रेजिमेंटमध्ये सामील झाल्यानंतर ते एलीट २२ या तुकडीत होते.

स्पेशल एअर सर्विस युनिटमध्ये असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये भाग घेतला होता. १९६९ला त्यांनी सैन्य सोडलं. हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय होता. यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्या बदलल्या. कोणत्याच नोकरीत त्यांचा जीव रमत नव्हता. अनेक नोकऱ्या एका पाठोपाठ सोडाव्या लागल्या. प्रियसीशी केलेल्या चुकीच्या वर्तवणूकीबद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

१९७६ला मॅक्लॅज यांची भेट डेट टॉमकिंस यांच्याशी झाली. ते चांगले मित्र बनले. इस्कोबारला उडवण्याची सुपारी देण्यासाठी टॉमकिंसनंच मॅक्लॅज यांच्याशी संपर्क करत जॉर्ज सालसेडो यांची भेट घालून दिली होती. मॅक्लॅजनं ही सुपारी घेतली.

म्हणून डाव फसला

पाब्लो त्यावेळी नेपल्स इस्टेमध्ये रहायचा. ही एक मोठी प्रॉपर्टी होती. यात पाब्लोच्या महाग गाड्या, अलिशान घर, खासगी विमानं होती. मॅक्लॅज यांनी इस्टेटीच व्यवस्थीत निरीक्षण केलं आणि पाब्लोला त्याच्या घराच्या परिसरात मारता येईल अशी त्यांनी हमी भरली.

टॉमकिंस यांनी इस्कोबारची (Pablo Escobar) हत्या करण्यासाठी १२ लोकांची टीम बोलावली. या टीममध्ये सामील असलेल्या प्रत्येकाला ५ हजार डॉलर्स प्रतिमाह दिले जायचे. सोबतच राहण्या-खाण्याची व्यवस्थाही केली जायची. ही टीम कोलंबियात वेगवेगळ्या ठिकाणी राहिली. ख्रिसमसच्या आठवड्यात पाब्लोची सुपारी वाजवण्याचं त्यांच नियोजन होतं

हल्ल्याच्या एक दिवस आधी त्यांनी जंगलात सराव या टीमनं केला. पुढच्याच दिवशी हेलिकॉप्टरनं पाब्लोच्या फार्म हाऊसवर हल्ला करायचा. त्याच्या सुरक्षा रक्षकांची हत्या करुन पाब्लोचं शिर ट्रॉफी सारखं मिरवत घेऊन जायचं असा त्यांचा प्लॅन होता.

हेलिकॉप्टरनं पाब्लोच्या फार्महाऊसच्या दिशेनं झेप घेतली. त्या १२ प्रशिक्षित हत्याऱ्यांसोबत ज्यांना पाब्लोचं शिर कापून आणायचं होतं पण नियतीच्या मनात वेगळाच डाव होता. पाब्लोच्या फार्म हाऊसवर पोहचण्याच्या आधीच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. पायलटचा मृत्यू झाला.

या अपघातात इतर बचावले पण मॅक्लॅज जबर जखमी होते. ते तीन दिवस कोलंबीयाच्या डोंगराळ भागात उपचारासाठी मदत मागत विव्हळत पडले होते. तिसऱ्या दिवशी ते सापडले म्हणून त्यांना वाचवण्यात यश आलं. पाब्लोच्या कानावर ही गोष्ट पडताच त्यानं माणसं पाठवली. पण मॅक्लॅज यांचं दैव बलवत्तर म्हणून ते बचावले.

मॅक्लॅज आता ७८ वर्षाचे आहेत. त्या घटनेपासून त्यांनी गुन्हेगारी जगताकडं पाठ फिरवली. तर १९९३ला इस्कोबार पोलिस कारवाईत मृत्यू पावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER