…तर फक्त गुजरातमध्येच धावेल बुलेट ट्रेन

- मोदी सरकारकडून प्लॅन बी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Modi)ड्रीम प्रोजेक्ट असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला ठाकरे सरकारकडून (Thackeray Govt) थंड प्रतिसाद आहे. असेच सुरू राहिले आणि महाराष्ट्र सरकारने आगामी ३ महिन्यांत जमिनीचे अपेक्षित अधिग्रहण केले आहि तर बुलेट ट्रेनची (Bullet train) गुजरातमधील (Gujarat) सेवा आधी सुरू होईल.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कोरोनाची साथ आणि ठाकरे सरकारची प्रकल्पाबद्दलची भूमिका यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा वेग महाराष्ट्रात मंदावला आहे. मात्र, बुलेट ट्रेन प्रकल्प ठरल्याप्रमाणे पूर्ण व्हावा यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) काम करते आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात अधिग्रहणाचा वेग अतिशय कमी आहे. पुढील ३ महिन्यांत अपेक्षित जमिनीचे अधिग्रहण न झाल्यास बुलेट ट्रेनची गुजरातमधील सेवा आधी सुरू होईल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनलाठी २०२३ डेडलाईन ठेवण्यात आली होती. पण कोरोनामुळे वर्ष वाया गेल्याने आता हा प्रकल्प पूर्ण होण्यास २०२४ वर्ष उजाडेल, अशी माहिती माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिली. हा प्रकल्प ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी ३५२ किलोमीटर प्रकल्प गुजरातमध्ये आहे. त्यासाठी ९५ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. पण महाराष्ट्रातल्या १५६ किलोमीटरपैकी केवळ २३ टक्केच जमिनीचे अधिग्रहण झाले आहे,’ अशी आकडेवारी खरे यांनी दिली.

गुजरातमधील उर्वरित ५ टक्के जमिनीचे जूनच्या मध्यापर्यंत अधिग्रहण होईल. पुढील तीन महिन्यांत ७० ते ८० टक्के जमीन अधिग्रहित झाल्यास पूर्ण प्रकल्प एकाचवेळी सुरू करता येईल. पण महाराष्ट्रातील जमिनीचे अधिग्रहण करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता जपानी कंपनीसोबत बोलणी सुरू आहे. महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहण रखडल्याने केवळ गुजरातमध्ये बुलेट ट्रेन सुरू करण्याचा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचा मानस आहे, असे म्हणालेत. या मार्गावर एकूण १२ स्थानक असतील; यातील ८ गुजरात, तर ४ स्थानक महाराष्ट्रात असतील.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण, आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER