
बॉलिवूडमध्ये (Bollywood) राज कपूर (Raj Kapoor) यांच्यानंतर सुभाष घई (Subhash Ghai) यांना शोमॅन म्हणून ओळखले जाते. त्यांचा प्रत्येक सिनेमा मल्टीस्टारर, संगीतमय आणि पूर्ण मनोरंजन करणारा असतो. बॉक्स ऑफिसवरही त्यांचे सिनेमे चांगलीच कमाई करीत असतात. मात्र गेल्या काही वर्षात सुभाष घई एकही हिट देऊ शकलेले नाहीत. शोमॅन सुभाष घई यांना त्यांच्या प्रत्येक सिनेमात एक सिग्नेचर ट्यून असावी असे वाटत असते. आणि त्यासाठी ते संगीतकाराकडून प्रचंड मेहनत करून घेत असतात. सिनेमा संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात अनेक वर्ष सिग्नेचर ट्यून बसलेली असते. मग ती कर्जमधील ‘एक हसीना थी’ वाली असो वी ‘हीरो’मधील जॅकीसाठी तयार केलेली बासरीची ट्यून असो. हीरोमधील बासरीच्या सिग्नेचर ट्यूनची कथा आज आम्ही तुम्हाला सांगतो.
सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांना घेऊन 1983 मध्ये ‘हीरो’ सिनेमाला सुरुवात केली होती. छोट्या मोट्या भूमिका करणाऱ्या जॅकीचा नायक म्हणून हा पहिलाच सिनेमा होता. यात तो एका गुंडाच्या भूमिकेत दाखवला असून इन्स्पेक्टर असलेल्या शम्मी कपूरच्या मुलीवर मिनाक्षी शेषाद्रीवर त्याचे प्रेम बसलेले दाखवले आहे. संजीव कुमार मिनाक्षीचा भाऊ दाखवलेला आहे. या सिनेमात सुभाष घई यांना जॅकीची ओळक बनू शकेल अशी एक विशिष्ट सिग्नेचर ट्यून हवी होती. या ट्यूबाबत बोलताना एकदा सुभाष घई यांनी सांगितले होते, या सिनेमाचा बासरीवरील ट्यून हा एक अत्यंत महत्वाचा घटक होता. जॅकीचा हा पहिलाच सिनेमा असल्याने मला त्याच्यासाठी काहीतरी वेगळे संगीत तयार करायचे होते. सिनेमाचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सिनेमाची कथा ऐकवून, जॅकी गुंड असला तरी तो रोमँटिक असल्याने त्यासाठी काही तरी वेगळे संगीत जॅकीसाठी तयार करा असे सांगितले होते. त्या दोघांनी खूप विचार केला आणि पियानोवर एक पीस त्यांनी वाजवून दाखवला. मला तो पीस खूपच आवडला आणि त्यानंतर आम्ही तो प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून तयार करून घेतला. या ट्यूनमुळे जॅकीची इमेज तयार झाली असेही सुभाष घई यांनी सांगितले होेते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला