म्हणून शेखर सुमन वाढदिवस साजरा करणार नाही

So Shekhar Suman will not celebrate his birthday

उद्या म्हणजे 7 डिसेंबर रोजी अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) याचा वाढदिवस आहे. प्रत्येक वर्षी तो वाढदिवसानिमित्त पार्टी देतो. परंतु यंदा कोरोना तर आहेच पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याला श्रद्धांजली म्हणून शेखर सुमनने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः शेखर सुमनने शनिवारी ही माहिती दिली.

शेखर सुमनने याबाबत ट्वीट करून लिहिले आहे, यावर्षी मी 7 डिसेंबरला माझा वाढदिवस साजरा करणार नाही. सुशांतसाठी मी कमीत कमी एवढे तरी करू शकतो. सध्या कोणीही उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये नाही. वाढदिवस साजरा करण्याऐवजी मी देवाकडे प्रार्थना करीन की सुशांतच्या आत्महत्येल दोषी असणारे लवकरात लवकर पडले जावो आणि या प्रकरणाचा शेवट होवो. यासोबतच त्याने हैशटैगस्टेयूनाइटेड4एसएसआर असेही लिहिले आहे.”

मला लोक भेटतात तेव्हा सुशांत केसचे काय झाले असे विचारतात. तेव्हा, मी सांगतो, माझ्याजवळ जर याचे उत्तर असते तर… आता फक्त आशा करू शकतो आणि प्रार्थना करू शकतो की, एखाद दिवस चमत्कार व्हावा. यापेक्षा आणखी काय करू शकतो असे म्हणच हैशटैग सीबीआईअरेस्टएसएसआर किलर्सनाओ असेही त्याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER