म्हणून शाहरुखने वीर झारामधून काढले होते ऐश्वर्या रायला

srk-ash-story

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बॉलिवूडची सगळ्यात सुंदर अभिनेत्री. तिने आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून अनेक निर्माते, दिग्दर्शक एका पायावर तयार राहात असत. परंतु बॉलिवू़डमध्ये (Bollywood) जर तुम्हाला काम करायचे असेल तर मात्र तुम्हाला सगळ्यांना खुश करावे लागते. तुमच्यात कितीही प्रतिभा असली आणि तुम्ही मोठ्या कलाकारांना खुश ठेवले नाही तर तुम्हाला कोणीही विचारत नाही. ऐश्वर्या विश्वसुंदरी असली तरी तिलाही या गोष्टीला सामोरे जावे लागले होते. आणि एक-दोन नव्हे तर चक्क पाच चित्रपटांमधून तिची छुट्टी करण्यात आली होती. आणि याचे एकमेव कारण होते सलमान खान.

सलमान खान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु सलमान ऐश्वर्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करीत असे आणि ऐश्वर्याला तेच आवडत नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि ऐश्वर्या त्याच्यापासून दूर गेली. परंतु ती सलमानपासून जशी दूर गेली तसे काही चित्रपटही तिच्या हातातून गेले. आमिर खानसोबत राजा हिंदुस्तानीमध्ये नायिका ऐश्वर्याची निवड झाली होती. परंतु सलमानशी पंगा असल्याने तिला चित्रपटातून काढण्यात आले. तिच्या जागी करिश्मा कपूरची निवड करण्यात आली. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. कमल हसननेही अभय चित्रपटात नायिका म्हणून ऐश्वर्या रायला घेतले होते. परंतु म्हणतात की सलमान खानमुळे ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

चोप्रा यांनीही शाहरुखसोबत वीर झारामध्ये ऐश्वर्याला नायिका म्हणून साईन केले होेते. परंतु शाहरुख खानने ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. तिच्या जागी प्रीति जिंटाला घेण्यात आले. शाहरुखनेच चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितल्याचे ऐश्वर्याला समजले होते. त्यामुळे तिने शाहरुखशी बोलणे बंद केले होेते. स्वतः ऐश्वर्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली. ऐश्वर्या म्हणाली, शाहरुखने त्या चित्रपटातून मला का काढले ते ठाऊक नाही. मी त्याला कधी त्याबाबत विचारलेही नाही. शाहरुखनेही एका मुलाखतीत ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकल्याचे मान्य केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER