..त्यामुळे राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार पण, मुख्यमंत्रीही संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतच आहेत

Uddhav Thackeray & Raj Thackeray

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेदेखील संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतच आहेत. आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे राज ठाकरे यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत. त्यामुळे मला या सगळ्यावर अधिक काही बोलायचे नाही असे कृषीमंत्री दादा भुसे म्हणालेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली तसेच, राज्य सराकर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर त्यांनी टीकादेखील केली. त्यानंतर, कृषीमंत्री दादा भूसे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि कांदा उत्पादकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यानंतर कांदा खरेदीच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय झाला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी केंद्र सरकारशी चर्चा करून कांद्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला असे उत्तर दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER