म्हणून राज कपूर शशी कपूरला टॅक्सी म्हणत असे

Raj Kapoor used to call Shashi Kapoor a taxi

राज कपूर (Raj Kapoor) आपल्या सहकलाकारांना टोपण नावे देण्यात सराईत होते. नव्या कलाकारांचे नवे नामकरण करण्यापासून त्यांना टोपण नावे देण्यास राज कपूर यांना खूप आवडत असे. अर्थात एखाद्या कलाकाराला टोपण नाव देताना ते त्याची आवड किंवा स्वभाव पाहून देत आणि ते टोपण नाव प्रचंड लोकप्रिय होत असे. राज कपूर आपला भाऊ शशी कपूरला टॅक्सी (Taxi) या टोपण नावाने हाक मारत असे. याचाही किस्सा फार मजेदार आहे.

शशी कपूरकडे आलिशान गाड्या होत्या आणि कोणीही त्याला लिफ्ट मागितली की शशी कपूर (Shashi Kapoor) त्या व्यक्तीला लिफ्ट देऊन पाहिजे तेथे सोडत असे. त्यामुळे राज कपूर शशी कपूरला टॅक्सी म्हणत असे. तसेच या टोपण नावाचे आणखी एक कारण म्हणजे शशी कपूर त्या काळाच प्रचंड व्यस्त असत. एका दिवशी तीन ते चार शिफ्टमध्ये ते काम करीत. कधी कधी तर गाडीतच झोप घेत असत.

त्यामुळे त्यांची कारच त्यांचा सेमी पर्मनंट अॅड्रेस झाला होता. सत्यम शिवम् सुंदरममध्ये शशी कपूर आणि झीनत अमान काम करीत होते. शूटिंगच्या वेळी जेव्हा राज कपूर या दोघांवर रागावत असत तेव्हा ते या दोघांनाही टॅक्सी म्हणत असत. ते म्हणत, तुम्ही टॅक्सीसारखे आहात. जो मीटर डाऊन करील त्याच्यासोबत कुठेही जाल. दोन तास इथे तर दोन तास तिथे. त्यामुळे तुम्ही कलाकार असलेली टॅक्सी झाला आहात असेही राज कपूरने म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER