म्हणून समीरा रेड्डीवर लोकं हसत असत

Mqaharashtra Today

समीरा रेड्डी (Sameera Reddy) एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. बोल्ड भूमिकांसाठीही ती ओळखली जात असे. समीराला डस्की ब्यूटी म्हणूनही बॉलिवूडमध्ये ओळखले जात असे. २००२ मध्ये मैंने दिल तुझको दिया सिनेमातून समीराने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. आणि केवळ दहा वर्षातच ती बॉलिवूडमधून बाहेर गेली. २०१२ मध्ये आलेल्या तेज सिनेमात तिने शेवटचे नायिकेचे काम केले होते. समीराने लग्न केले असून ती सध्या संसारात मग्न आहे. मोठ्या पडद्यापासून दूर असलेली समीरा सोशल मीडियावर मात्र अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच तिच्या पर्सनल गोष्टी सांगत असते. आताही समीराने तिचा एक जुना फोटो शेअर करीत लहानपणीच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. तिला लोकं का हसत हेसुद्धा तिने यावेळी सांगितलेले आहे.

समीराने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो अत्यंत जुना असून यात ती सावळी आणि जाडी दिसत आहे. या फोटोसोबत समीराने लिहिले आहे, माझे वजन खूप जास्त होते त्यामुळे सगळे मला चिडवत असत. लोकं चिडवत असल्याने मी बोलण्यास घाबरत असे. त्यामुळे कधी कधी मी बोलताना अडखळत असे. त्यामुळे तर लोकं अजूनच हसत असत. माझ्या मुलांना मात्र मी माणूसकी शिकवणार आहे. तसेच अधिक सहनशील आणि सगळ्या गोष्टींचा स्वीकार करण्यासही त्यांना सक्षम बनवणार आहे. दोन माणसे कधीही एकसारखी नसतात. माझ्यावर होणाऱ्या टीका आणि चिडवण्यापासून लांब जाणे माझ्यासाठी खूप कठिण होते. आपल्या मुलांनाही आपण त्याच जागेवर पाठवत आहोत का असा प्रश्न करीत मला विश्वास आहे की आपण दयाळू आणि सतर्क आहोत.’ समीराच्या या पोस्टर प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून अनेकांनी तिचे समर्थन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER