…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते ; शिवसेनेची टीका

Gopichand Padalkar - CM Uddhav Thackeray

मुंबई :- दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आणि राज्यात आणीबाणी लागू करा अशा विरोधकांच्या मागणीवरुन शिवसेनेने (Shiv Sena) विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आशिष शेलार (Ashish Shelar) आणि गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) अशा भाजप नेत्यांनावर शिवसेनेचे सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.

आजचा सामानातील अग्रेलख :
ल्या 18 दिवसांपासून दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून आता शिवसेनेनं भाजपला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकुमशाही प्रवृत्तीची भीती वीटत नाही. अठरा दिवसांपासुन पंजब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधुर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला, अशा शब्दात शिवसेनेने विरोधकांवर हल्लाबोल केला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणीबाणी लागू करा अशी मागणी विरोधी पक्षनेते करत आहेत. यावरही शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ‘बऱ्याच दिवसांनंतर फडणवीसांचा सूर लागला पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत, असे म्हणत शिवसेनेकडून फडणवीसांसह इतर नेत्यांवरही टीका करण्यात आली आहे.

… तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं

इतकंच नाही तर यावेळी पडळकरांनाही शिवसेनेनं निशाणा केलं आहे. ‘विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच.

कोणत्याही मुद्द्यावर भाजप आणीबाणीची भाषा करतं. पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर बोट करणारे आणि आपल्या राज्याविषयी चुकीचं बोलणारे भाजपला चालणार असतील तर त्यांची खणा-नारळाने ओटी भरावी अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी लिहलं की, ‘महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर दारूच्या गुळण्या टाकत असेल तर त्या उपटसुंभांना सोडताही कामा नये. एक वृत्तवाहिनीचा मालक मराठी उद्योजकास आत्महत्या करण्यास भाग पाडतो, हा साधा गुन्हा आहे काय? बाकी त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी, घाणेरड्या भाषेत उल्लेख केला ते तूर्त बाजूला ठेवा. त्याबद्दल भाजपने त्याचे शाल व श्रीफळ देऊन कौतुक करावे, पण मराठी उद्योजकाने या माणसाच्या दहशतीखाली आत्महत्या केली, त्याचाही कायद्याने तपास करायचा नाही काय? मुंबईला पाकिस्तान, पोलिसांना माफिया वगैरे बोलणे हे विरोधी पक्षाला मान्य आहे काय? तसे असेल तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी! एकदा तुमचे संस्कार व संस्कृती चव्हाटय़ावर येऊ द्या, असे शिवसेनेने म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : रावसाहेब दानवेंची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षिस ;  शिवसैनिकाची ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER