
बॉलिवुडमध्ये (Bollywood) सगळ्या नव्या कलाकारांना सुरुवातीच्या काळात खूप वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. काम मागायला गेल्यावर त्यांचा अपमानही केला जातो. अनेक मोठ्या कलाकारांसोबत अशा घटना घडलेल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी काम सुरु ठेवले आणि यश मिळवले. नोरा फतेहीसुद्धा अशाच अनुभवातून गेलेली अभिनेत्री आहे. स्वतः नोरानेच (Nora Fatehi) तिला आलेल्या अनुभवाबाबत सांगितले आहे.
नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात दिलबर हे आयटम साँग करून बॉलिवुडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने डांस शोमध्येही भाग घेतला होता. याशिवाय ‘स्त्री’ सिनेमातील ‘कमरिया’ आणि जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ सिनेमात ‘ओ साकी साकी’ या हिट गाण्यांमध्ये तिने आपली प्रतिभा दाखवली होती. ‘बिग बॉस’, ‘झलक दिखला झा’मध्येही नोरा दिसली होती. नोरा आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अजय देवगणच्या ‘भुज- द प्राईड’मध्येही दिसणार आहे.
नोराने सुरुवातीच्या काळात तिला आलेल्या अनुभवाबाबत बोलताना सांगितले, बॉलिवुडमध्ये काम करण्यासाठी मी कॅनडाहूून मुंबईला आले होते. एकदा एका कास्टिंग डायरेक्टरने मला तिच्या घरी बोलावले. काही दिवसांपूर्वीच माझी आणि तिची भेट झाली होती. काम मिळेल या आशेने मी तिच्या घरी गेले होते. तेव्हा ती जे काही बोलली ते ऐकल्यानंतर गाशा गुंडाळून पुन्हा कॅनडाला जावे असे मला वाटू लागले होते. तिने मला म्हटले, तुझ्यासारख्या अनेक जणी येथे कामासाठी येतात. तुमच्यासारख्या मुलींमुळेच इंडस्ट्रीतील लोक त्रासली आहेत. आम्हाला तुझी गरज नाही. तुझ्यात काहीही टॅलेंट नाही आणि तुझी आम्हाला गरजही नाही असे म्हटले. एवढेच नव्हे तर ती माझ्यावर ओरडतही होती. ते सगळे ऐकल्यावर मला खूप वाईट वाटले आणि मला रडूच आले. मला असे काही होईल असे वाटलेही नव्हते. तेव्हाच पुन्हा परत जावे असे मला वाटले. मी बाहेर आले आणि स्वतःला सावरून पुन्हा संघर्ष करण्यास सुरुवात केली असेही नोराने सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला