…म्हणून पवारांना बारामतीत कोणी हरवू शकत नाही

Ajit Pawar - Baramati

म्हणूनच बारामतीकर पवारांना पुजतात…

पुणे : बारामती आणि पवार यांच्यातील ऋणानुबंध अवघा महाराष्ट्र जाणतो. येथेच पवारांच्या पिढींची जडण घडण झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या समोरच्या सर्वच पिढ्यांना राजकीय संस्काराचे धडे घरातूनच मिळाले आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ आणि प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाची पद्धत आमि जनतेच्या प्रश्नांचा तात्काळ निवाडा करण्याचा त्यांचा स्वभाव याचे दर्शन बारामतीकर तसेच पुणेकरांसह राज्यातील जनतेलाही घडले आहे.

अजित पवारांजवळ एखादे प्रकरण गेले की फत्तेच झाले असे समजावे हा विश्वास अनेकांनी कमावला आहे. त्यातच बारामतीकरांना तर पवार म्हणजे त्यांचे दैवतच असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

नुकतेच काल 24 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत पोहचले. समोर आलेल्या कार्यकर्त्यांना निराश न करता थेट एक घाव दोन तुकडे हा अजित पवार यांचा स्वभाव असल्यानं त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गर्दी करतात.

बारामतीतही आज (24 जानेवारी) अजित पवार यांच्या भेटीसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या.

याच निमित्ताने अजित पवार यांनी नागरिकांची गाऱ्हाणी मांडल्यानंतर त्यावर तात्काळ निर्णय घेतला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या परिसरात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या ठिकाणी नागरिकांनी खास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी लांबच लांब रांगा केल्या. कुणी सार्वजनिक कामासाठी, तर कुणी व्यक्तीगत गाऱ्हाणं घेऊन इथं आले होते.

अनेक नेते वातानुकुलित कक्षात बसून जनतेच्या अडीअडचणी ऐकतात. इथं मात्र रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांजवळ जाऊन अजित पवार त्यांचं म्हणणं ऐकतात. म्हणूनच पवारांना बारामतीत कोणी हरवू शकत नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER