…त्यामुळे नाशिकचा शेतकरी मुजफ्फपूरच्या व्यापाऱ्याला पाठवू शकला ३० किलो डाळिंब – मोदी

Pm

दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत उत्तर दिले. नव्या कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देताना नाशिकच्या शेतकऱ्यांचे उदाहरण दिले.

नरेंद्र मोदी यांनी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. मोदी म्हणाले, कोरोना काळात सरकारने किसान रेल्वेचा प्रयोग केला. किसान रेल्वेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी मदत झाली. ही रेल्वे एक प्रकारचे कोल्ड स्टोरेज आहे. यामुळे एका राज्यातील छोट्या शेतकऱ्यालाही दुसऱ्या राज्यातील व्यापाऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी मदत झाली आहे. नाशिकमधील एक शेतकरी मुजफ्फपूरमधील व्यापाऱ्याशी जोडला गेला. त्याने फार काही नाही, फक्त ३० किलो डाळिंब किसान रेल्वेने पाठवले. त्याला त्यासाठी खर्च आला १४२ रुपये! त्याला मोठी बाजारपेठ मिळाली. ३० किलो माल कुरिअर घेऊन जाणार नाही. या व्यवस्थेमुळे शेतकरी दुसरीकडे माल विकू शकत आहेत.

एकाने अंडी पाठवली. त्याला खर्च आला ६० रुपये. देवळालीच्या शेतकऱ्यांने ७ किलो किवी दानापूरला पाठवली. त्याला खर्च आला ६२ रुपये. पण, त्याला ७ किलो किवीसाठी चांगली बाजारपेठ मिळाली, तीही दुसऱ्या राज्यात, असे सांगून मोदींनी किसान रेल्वेचे महत्त्व विशद केले.

ही बातमी पण वाचा :  “नटसम्राट व्हायचं असेल तर मोदींनी चित्रपटात काम करावं.” : नाना पटोले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER