एका आत्महत्येमागे एवढी चर्चा आणि इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष : शरद पवार

Sharad Pawar

नवी दिल्ली : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणाला तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा या प्रकरणावर अजूनही तेवढीच जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच या आत्महत्येवरून शरद पवार यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एका आत्महत्येची एवढी चर्चा आणि इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी अद्यापही तपास सुरू असून ड्रग्जप्रकरणात रोज नव्या सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. यावरून शरद पवार नाराजी व्यक्त करत म्हणाले, देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत असताना गेल्या तीन महिन्यांपासून एका आत्महत्येवर इतकी गंभीर चर्चा सुरू आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवारांना सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी तपासात आता ड्रग्जप्रकरणी अनेक सेलिब्रेटींची नावं समोर येत असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “मला माहिती नाही, मी याकडे लक्ष देत नाही. आत्महत्या कोणाचीही असो दु:ख होतं यात काही वाद नाही. पण एका आत्महत्येवरून गेले तीन महिने देशात इतकी गंभीर चर्चा सुरू आहे. पण मला भीती आहे, ती म्हणजे दिवसाला १० ते १५ तर महिन्याला ३०० ते ४५० शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटत नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER