…म्हणून मोदींनी लॉकडाऊन लावला होता; आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर पलटवार

Ashish Shelar

मुंबई :- राज्यात भाजपाकडून (BJP) लॉकडाऊनला विरोध होत असल्याने महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून मोदींनी लागू केलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

एका वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एकमेव पर्याय म्हणून जनसहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आज एका वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असं बरंच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच ‘हुशार’ सत्ताधारी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही किंवा लॉकडाऊनला विरोधही करीत नाही; कारण जनतेचा जीव महत्त्वाचा ! असेही शेलार यांनी म्हटले.

मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारनं रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली. धान्य, निवारा दिला! आज मजुरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत… रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना? अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button