…तर मोदी लॉकडाउन टाळतायत; सचिन सावंत यांचा दावा

Sachin Sawant - PM Narendra Modi

मुंबई : काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली. “कोणतेही नियोजन नसणे हे कोरोनापेक्षा जास्त घातक आहे.” असे सचिन सावंत म्हणाले. देशात रोज कोरोना (Corona) रुग्ण ४ लाखापर्यंत पोहोचली आहे. पण तरीही लॉकडाउनचा (Lockdown) निर्णय घेत नाहीत, अशी टीका सचिन सावंत यांनी मोदींवर केली.

“देशात सध्या बेड्स, ऑक्सिजन (Oxygen), रेमडेसिवीर (Remdesivir) आणि आरोग्य सेवकांची कमतरता आहे. त्याबद्दल सावंतांनी उपरोधिकपणे मोदींचे आभार मानले आहेत. लसींचा पुरवठा बंद झाला आहे. कोरोनापेक्षा लोक भीतीने जास्त मरत आहेत. दिवसाला रुग्णसंख्या ४ लाखापर्यंत पोहोचली आहे. आर्थिक पॅकेज जाहीर करावे, पण लागू नये, यासाठी पंतप्रधान मोदींनी लॉकडाउनचा निर्णय जाहीर केलेला नाही. मागीलवर्षी ५० हजार रुग्णसंख्या असताना पंतप्रधान मोदींनी लॉकडाउन जाहीर केला होता.” असे सचिन सावंत यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button