म्हणून मनमोहन देसाई यांनी दिली अमिताभला व्हॅनिटी व्हॅन

Amitabh Bachchan - Manmohan Desai

सध्या सर्वच चित्रपट आणि मालिकांच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅन सर्रास दिसतात. परंतु काही काळापूर्वी कलाकार स्टुडियोत असलेल्या कलाकारांच्या रूममध्येच आराम करीत असत. त्यांच्या या रूम सर्व सुविधांनी सज्ज असत. मात्र आउटडोर शूटिंगच्या वेळेस कलाकारांना प्रचंड त्रास होत असे. स्टुडियोतील रूमपेक्षा आणखी जास्त सुविधाजनक आणि आरामदायक जागा कलाकारांना असावी असे वाटू लागले आणि त्यातूनच व्हॅनिटी व्हॅनचा जन्म झाला.

सगळ्यात पहिली व्हॅनिटी व्हॅन प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी बॉलिवुडमध्ये (Bollywood) लाँच केली असे म्हटले जाते. मात्र त्या काळात सगळ्यांनाच व्हॅनिटी व्हॅन दिली जात नसे. मात्र मनमोहन देसाई यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पहिली व्हॅनिटी व्हॅन भेट म्हणून दिली होती. याबाबत एकदा अमिताभ बच्चन यांनीच स्वतः ही माहिती शेअर केली होती.

माझे ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मी पुन्हा सेटवर आलो तेव्हा मला आराम मिळावा म्हणून मनमोहन देसाई यांनी मला व्हॅनिटी व्हॅन भेट दिली होती. परंतु खरे सांगायचे तर प्रवास करताना मनमोहन देसाई यांनी आराम करण्यासाठी त्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची निर्मिती करून घेतली होती. यात बेड, टीव्हीसह सर्व सुविधा होत्या आणि ही व्हॅन पाहाण्यासाठी अनेक कलाकार येत असत. काही दिवसानंतर त्यांनी मला व्हॅनिटी व्हॅन भेट दिली. मी त्या व्हॅनमध्ये म्यूझिक सिस्टिम लावून घेतली होती असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER