
नवीन नायिकांमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) केवळ शोभेची बाहुली नाही तर एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये नायिकाप्रधान सिनेमांसाठी ज्या अभिनेत्रींचा प्रामुख्याने विचार केला जातो त्याच आलियाचा नंबर फार वरचा आहे. सध्या ती संजय लीला भंसाळीच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. या सिनेमाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली असून ते सिनेमाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. या सिनेमासोबत रणबीर कपूरबरोबर तिच्या लग्नाच्या चर्चाही सध्या जोरदारपणे सुरु आहेत. पण याच आलियाला तिचे वडिल महेश भट्ट (Mahesh Bhatt) बाथरूममध्ये बंद करण्याची धमकी देत असत. हे वाक्य वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. आलियाने जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा आम्हालाही असाच धक्का बसला होता.
त्याचे झाले असे. आलियाला एका मुलाखतीत तिच्या लग्नाला वडिल महेश भट्ट तयार आहेत का असा प्रश्न विचारला. तेव्हा आलियाने उत्तर दिले, माझे वडिल माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतात. ते आमच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह आहेत. त्यांना आमची खूप काळजी वाटते. त्यांचा अधिकार चालत असता तर ते आमचे कधीही लग्न होऊ देणार नाहीत. आम्ही दोघी त्यांच्यापासून दूर जावे असे त्यांना वाटतच नाही. आलियाने पुढे सांगितले, घरात जर मी लग्नाची गोष्ट काढली की ते लगेचच मला बाथरूममध्ये बंद करण्याची धमकी देत असत. ते म्हणत मी तुला माझ्या डोळ्यासमोरून दूर होऊ देणार नाही. आम्हा दोघींवर त्यांचे खूप प्रेम आहे. कधी ना कधी तरी मुलगी लग्न करून सासरी जाणार हे त्यांच्या आता लक्षात आले आहे. ते आमच्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम करतात. पण आता लग्नाचा विषय काढला की बाथरूममध्ये बंद करण्याची धमकी देत नाहीत असेही आलियाने यावेळी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला