…तर लॉकडाउन कराच; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक

uddhav thackeray- harbhajan singh - Maharastra Today
uddhav thackeray- harbhajan singh - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याचे संकेत दिले आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करत नसल्यामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. हे जर असेच सुरू राहिले तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य एएनआयने ट्विट केले होते. हरभजन सिंगने या ट्विटला रिप्लाय केला आहे. “लोक जर सांगूनही ऐकत नसतील, तर लॉकडाउन कराच. लोक कधी गांभीर्याने मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही.” असा संताप हरभजन सिंगने ट्विटद्वारे केला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या निर्बंधाबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे नागरिकांना अनिवार्य असणार आहे, पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button