…तर MPSCच्या अध्यक्षाची गाढवावरून धिंड काढू : गोपीचंद पडळकर

gopichand padalkar - Maharastra Today

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. जर पुन्हा अशी अफरातफर झाली तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची गाढवावर बसून धिंड काढू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात राज्य सरकार PSI च्या ६०५ जागा भरणार असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार NT प्रवर्गासाठी साडेतीन टक्क्यांनी २२ जागा असणे गरजेचे आहे; पण त्यात फक्त दोन  जागा NT प्रवर्गासाठी दिल्या आहे. त्यामुळे उरलेल्या २० जागा कुठे गेल्या? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

MPSC भरती प्रक्रियेबाबत अफरातफर करत असतील, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची हकालपट्टी करावी, अशी मागणीही गोपीचंद पडळकरांनी राज्यपालांना केली आहे. २०१० ते २०१९पर्यंत NT च्या २९३ जागा भरायच्या होत्या. त्यापैकी २०० जागा भरल्या. उरलेल्या ९३ जागा चोरीला गेल्या आहेत, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे. सरकारने सुधारित जाहिरात काढा, त्यानंतरच परीक्षा घ्या. जर सुधारित जाहिरात काढली नाही तर आम्ही महाराष्ट्रात परीक्षा होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो : गोपीचंद पडळकर 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button