म्हणून सोडली गोवा ट्रिप

Akshaya Naik

तुम्ही खूप मस्त पैकी एखाद्य ट्रीपला गेला आहात आणि त्या ट्रिपमध्ये एन्जॉय करत असताना तुम्हाला एक फोन येतो. तो फोन तुमचे आयुष्य बदलून टाकणारा असतो. तुमच्या समोर एक संधी असते. तुम्हाला आवडणारे काम करण्याची. तुमच्या समोर दोन पर्याय असतात, एक ती संधी घेणे आणि तुमच्या मनातली ट्रीप एन्जॉय करने. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची नायिका अक्षया नाईक हि च्यासमोर देखील या वर्षीच्या सुरुवातीला हे दोन पर्याय आले आणि तिने गोव्यातली ट्रिप सोडून ‘सुंदरा’कडे धाव घेतली. नुकताच अक्षयाने त्या गोवा ट्रिप मधला एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो क्लिक केल्यानंतर पुढचा फोन मला सुंदरा मालिकेत काम करणार का असे विचारण्यासाठी आला. आणि हो, त्यानंतर मी पुढचे सगळे गोव्यातले प्लॅन कॅन्सल केले.

2020 हे वर्ष अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवून गेलं. कुणाच्या हातातली संधी हिरावून गेली तर कोणाला नव्याने अनेक संधी उपलब्ध झाल्या. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची नायिका अक्षया नाईक हिने देखील या वर्षाची एक वेगळीच आठवण तिच्या इन्स्टा पेजवर शेअर केली आहे. सध्याची कोरोनाजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी एक महिना अगोदर अक्षया तिच्या फॅमीली सोबत गोव्याला सहलीला गेली होती. गेल्या सात महिन्यांपासून आपण प्रत्येक जण कोरोना (Corona) परिस्थितीची लढा देत आहोत आणि यावर्षीच्या सुरुवातीला आम्ही ठरवलं की सगळे कुटुंबीय मिळून गोव्याला ट्रीपला जायचं. अक्षया बर्‍याच दिवसांनी गोव्याला जाणार होती त्यामुळे तिच्या मनातही गोव्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. चार-पाच दिवसांचा मस्त प्लान होता. गोव्याचे समुद्र किनारे नारळाच्या बागा सोबत फोटोसेशन सुरू होतं. पुढे कोरोनामुळे अशी काही परिस्थिती निर्माण होईल याचा विचारही केला नव्हता .त्यामुळे खऱ्या अर्थाने धम्माल सुरू होती.

अक्षया सांगते, असंच एकदा फोटोसेशन करत असताना मला कलर्स वाहिनी कडून फोन आला शारीरिक वजनाने जाड असलेल्या मुलींकडे समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्यासाठी लग्न किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी अशा मुलींचे लग्न हा खूप चिंतेचा विषय असतो या एका सामाजिक विषयावर सुंदरा मनामध्ये भरली नावाची मालिका सुरू होणार आहे. आणि या या मालिकेतील लतिका या भूमिकेसाठी तुम्ही काम करायला होकार द्याल का. अक्षयाला मुळातच या मालिकेचा फ्लेवर खूप आवडला. अशा अनेक मुली मैत्रिणी म्हणून तिच्या आयुष्यामध्ये होत्या की ज्यांना त्यांच्या शारीरिक वजनामुळे लग्नासाठी नकार येत होते. शिवाय अक्षया देखील प्रत्यक्षात आयुष्यामध्ये वजनाने जाड आहेत. त्यामुळे सौंदर्याची परिभाषा आणि शारीरिक वजन जास्त असणे याचा नेहमीच संघर्ष देखील करावा लागला होता. मात्र त्याचे कुटुंबीय तिच्यासाठी नेहमीच सपोर्ट सिस्टिम होते.

गोव्यात धमाल मजा करत असताना अक्षयला कलर्स वाहिनीकडून फोन आल्यानंतर तिने तडक गोव्यातील पुढचे तीनही दिवसाचा प्लान कॅन्सल केला आणि ती ऑडिशनसाठी दाखल झाली.

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सूरू होऊन फार दिवस झाले नाहीत. मात्र पहिल्या भागापासून या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अक्षयासाठी हा गेल्या सात महिन्याचा काळ देखील खूप काही शिकवून जाणारा होता. एक तर कोरोना नंतर अनलॉक सुरू झाले आणि त्या काळामध्ये सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले. त्यामुळे मनात एक वेगळ्या प्रकारची भिती देखील होती. पण याच वेळी एकमेकांची साथ असेल एकमेकांचे सहकार्य असेल तर आपण कोणत्याही संकटातून कसा मार्ग काढू शकतो हे या मालिकेतल्या संपूर्ण चित्रीकरण सेटवर असलेल्या आमच्या एकोप्याने मला दाखवून दिलं. खरं हा प्रत्येकासाठी खरंच हा काळ प्रत्येकासाठी त्याचे त्याचे आयुष्य बदलून टाकणारा होता. अनेकांच्या जवळची माणसं या कार्यात कायमची दुरावली . अनेकांच्या हातातील नोकऱ्या देखील गेल्या. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन शब्दांचा अनोखा आणि विचित्र खेळ या गेल्या सहा महिन्यांमध्ये नियतीने माणसाला दाखवून दिला. त्यामुळे एखाद्या गोष्टीची किंमत म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचे आपल्या आयुष्यातील महत्त्व हे देखील या कोरोना काळामध्ये प्रत्येकाने अनुभवले. माझ्यासाठी म्हणाल तर आत्तापर्यंत हिंदी मालिकांमध्ये काम करत होते. परंतु सुंदरा मनामध्ये भरली सारखी एक मराठी मालिका जी एक खरोखर सामाजिक विषयावर भाष्य करणारी मालिका आहे. या मालिकेचा भाग होण्याची संधी मला मिळाली. बर्‍याच दिवसांनी मोबाईल मधले फोटो चाळत असताना तीच्या डोळ्यासमोर तिचा हा गोवा ट्रिप मधला फोटो आला आणि तिला सगळ्या गोष्टी अशा आठवत राहिल्या. हाच तो क्षण होता यावेळेला एका क्षणापर्यंत माझ्या हातात कुठलेच काम नव्हतं पण दुसऱ्याच क्षणी मला एका चॅनेल कडून फोन आला आणि सुंदरा करण्याची संधी माझ्याकडे चालून आली. आयुष्य अस एका क्षणाने बदलून जाणारे आहे आणि म्हणूनच सांगते की जी संधी तुमच्या समोर आहे त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आपण वर्णाने काळे आहोत की गोरे आपण शरीराने जाड आहोत की बारीक यापेक्षा देखील आपल्या स्वभावातला गुण आणि चांगली संधी घेऊन तिचे सोने करण्यासाठी लागणारे कष्ट, मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोरोनासारख्या कुठल्याही परिस्थितीत आपण नेहमी मनाने पॉझिटिव्ह राहू शकतो.

ही बातमी पण वाचा : मणीराज करंजी…तर शिवानी मालपोआ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER