तर, खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही – शिवसेना

Eknath Khadse & Uddhav Thackeray

रत्नागिरी : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते, भाजपचे नेते देवेंद्र पडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक टिप्पणी सुरू केली आहे. त्यातच शिवसेनेने (Shivsena) पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना खुली ऑफर दिली आहे. “खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही”, असे शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खडसेंचं जाहीर युद्ध सुरु आहे. खडसे जर वेगळा विचार करणार असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही”, असं उदय सामंत म्हणाले.

ज्यांच्यामुळे राज्यात भाजपची सत्ता आली, त्या खडसेंवर ही वेळ येणं हे दुर्दैवी आहे. पण खडसेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे असा टोला सामंत यांनी फडणवीसांचे नाव न घेता लगावला. तसेच भाजपमधील अशाच खदखदीमुळे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावादेखील सामंत यांनी केला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER