… तर आघाडी सरकार केंद्रामध्ये उचलून ठेवा; प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

Prasad Lad - Uddhav Thackeray

मुंबई : कोरोना लसीच्या (Coronavirus Vaccine) वितरणाचा खर्च केंद्र सरकारने (Central Government) करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली आहे. त्यावर भाजप (BJP) नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी टीकास्त्र सोडले आहे .

राज्य हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं सध्या आघाडी सरकारचं सुरू आहे. या सरकारने लसीच्या वितरणाचा खर्च केंद्राने करण्याची मागणी करण्यापेक्षा राज्यातील आघाडी सरकारच केंद्रात उचलून ठेवावं, असा टोला लाड यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष एकत्र येऊन चंद्रकांत पाटलांविरोधात (Chandrakant Patil) लढले तरी चंद्रकांतदादांना पाडणं अशक्य आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढल्याने काहीच फायदा होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मनपा निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो, कोल्हापुरातील चंद्रकांत पाटलांची ताकद काय आहे हे त्यांना कळेलच, असेही लाड म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER