…तर जळगावची बदनामी आहे; याप्रकरणावरून नाथाभाऊ आक्रमक

Maharashtra Today

मुंबई : जळगावमधील (Jalgaon) आशादीप वसतिगृहात पोलिसांनी महिलांना विवस्त्र होऊन नाचायला लावले, हा प्रकार खोटा असून यावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) चांगलेच संतापले. आशादीप वसतिगृहाची अनावश्यक बदनामी झाली. या प्रकरणाची माहिती घेऊन विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते. जळगावाची बदनामी झाल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मार्चला चौकशी अहवाल विधानसभेत सादर केला. अहवालानुसार कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले जात आहे.

“आशादीप वसतिगृहप्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणात विरोधकांनी माहिती घेतली पाहिजे आणि जबाबदार पक्षाने यावर बोलले पाहिजे होते. राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे.” असे एकनाथ खढसे म्हणाले.

आशादीप वसतिगृहात महिलांना विवस्त्र होऊन नाचायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका केली. याच मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला. त्यानंतर हे उघडकीस आले की, महिलांना नाचण्यास भाग पाडण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही.

दरम्यान, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ४ मार्चला वसतिगृहप्रकरणाच्या चौकशी अहवालातील माहिती विधानसभेत मांडली. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये सहा महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. या वसतिगृहात १७ महिला राहत होत्या. २० फेब्रुवारी रोजी या वसतिगृहात गरबा कार्यक्रम आयोजित केला होता. डान्स करताना त्रास होत असल्यामुळे एका महिलेनी झगा काढला. या ठिकाणी कोणताही प्रकार घडला नाही. अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, रत्नमाला सोनार यांनी पोलिसांकडून महिलांना विवस्त्र केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER