…तर वाजवून दाखवतो किती आमदार आमच्या सोबत, अजित दादांचे थेट विरोधकांना आव्हान

Ajit Pawar

मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलणं टाळलं. पूजा (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरण, संजय राठोडपासून अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच सरकारची भूमिका मांडली. मात्र, पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नसल्याचं वक्तव्य सांगत प्रश्न विचारला. यानंतर अजित पवार यांनी हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) अविश्वास ठराव आणून दाखवावा, असं थेट आव्हान भाजपला (BJP) दिलं.

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलं, सरकार पळ काढतंय असा आरोप विरोधकांनी केलाय. सरकारचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.” यावर अजित पवार म्हणाले, “जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा. वाजवून दाखवतो की किती आमदार आमच्या सोबत आहेत आणि किती त्यांच्यासोबत. असे म्हणत त्यांनी थेट विरोधकांना आव्हानच देऊन टाकले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER