म्हणून ईशा देओलने अमृता रावच्या मारले होते थोबाडीत

Isha Deol-Amrita rao

ईशा देओल ( Isha Deol) आणि अमृता रावने ( Amrita Rao) आयुष्यात फक्त एकदाच एकत्र काम केले. प्रख्यात निर्माता दिग्दर्शक इंद्रकुमारच्या ‘प्यारे मोहन’ (Pyare Mohan)चित्रपटात या दोघी एकत्र आल्या होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटात दोघी बहिणी झाल्या होत्या. मात्र एकदा सेटवर असे काही घडले की, दोघींमध्ये प्रचंड भांडण झाले आणि रागाच्या तिरमिरीच ईशाने अमृताच्या खाडकन कानाखाली वाजवली होती.

एकदा स्वतः ईशानेच बोलताना ही घटना सांगितली होती. चित्रपटात आम्ही दोघी बहिणीची भूमिका करीत होतो. आमच्या दोघांमध्ये विशेष मैत्री नव्हती आणि दुश्मनीही नव्हती. शॉट ओके झाला की आम्ही वेगळे जाऊन बसत असू. आमच्यात गप्पाही कमी होत असत. एक दिवस मात्र काय झाले कोणास ठाऊक पॅक अप झाल्यानंतर अमृताने दिग्दर्शक इंद्रकुमार आणि कॅमेरामॅनच्या समोर मला शिव्या देण्यास सुरुवात केली. मला काय होत आहे तेच कळत नव्हते. अमृताला रोखण्याचा प्रयत्न काही जणांनी केला पण ती ऐकायलाच तयार नव्हती. मलाही माझी ईमेज जपायचे असल्याने मी तिच्या खाडकन थोबाडीत ठेऊन दिले.

या घटनेनंतर या दोघींनी बरेच दिवस एकत्र कामच केले नाही. मात्र एक दिवस अमृताला तिची चूक कळली आणि तिने ईशाची माफी मागितली, त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरु झाले असे सांगितले जाते. आजही ईशा आणि अमृता एकमेकींशी बोलत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER