म्हणून प्राजक्ताऐवजी आली वीणा!

Veena Jagtap - Prajakta Gaikwad

आई माझी काळुबाई ही मालिका सुरू होऊन जेमतेम महिना ते दीड महिना झाला 1असतानाच मालिकेची मुख्य नायिका प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिने मालिकेला रामराम ठोकला आहे. आता काळुबाईची भक्त अर्थात आर्याच्या भूमिकेत वीणा जगताप (Veena Jagtap) पडद्यावर दिसणार आहे. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वादाने गाठले. याचा शेवट प्राजक्ताने मालिका सोडण्यात पर्यंत गेलेला आहे.

एखाद्या कलाकाराने मधूनच मालिका सोडून देणे हे काही प्रेक्षकांसाठी नवीन नाही. पण त्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. अनेकदा मालिका सुरू होऊन वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर त्या कलाकारांच्या तारखांचा प्रश्न निर्माण होतो, कधी नायिका विवाहबद्ध होतात किंवा काही कारणाने त्यांना परदेशात जावे लागते आणि अशामुळे मालिकेतील ते पात्र दुसरा कलाकार वठवतो. आई माझी काळुबाई या मालिकेच्या प्रवासात आता हेच वळण आले आहे. गेल्याच महिन्यात या मालिकेतील ज्येष्ठ कलाकार आणि अमोघ या व्यक्तिरेखेच्या आजीची भूमिका करणाऱ्या आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यावेळी मालिकेच्या संपूर्ण ग्रुपमधील 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे ही मालिका अधिकच चर्चेत आली. मात्र आता पुन्हा ही मालिका चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे या मालिकेची नायिका प्राजक्ता गायकवाड हिने या मालिकेत पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राजक्ता या मालिकेत काळुबाईची भक्त असलेल्या आर्याची भूमिका.करत होती. लव लग्न लोच्या फेम राघव म्हणजेच विवेक सांगळे या मालिकेत अमोघ ही नायकाची भूमिका करत आहे. आता वीणा जगताप नायिका म्हणून दिसणार आहे.

मालिका सुरू होऊन एक महिना झाला असताना प्राजक्ताने ही मालिका का सोडली असा प्रश्न साहजिकच प्रेक्षकांना पडला होता. याबाबत प्राजक्ता म्हणाली, मालिकेत काही कलाकार प्रवास करून आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली नाही याबाबत मी प्रश्न विचारल्याने मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांना राग आला. तर अलका कुबल यांचे म्हणणे आहे की, प्राजक्ता नेहमी सेटवर उशिरा येते. अचानक चित्रिकरण करण्यासाठी वेळ नाही असं सांगते. तसेच तिच्या आईचा हस्तक्षेप देखील वाढत आहे. या कारणाने आमच्याकडून तिला काम थांबवण्या बाबत सांगितले. प्राजक्ता कडून सतत वेगवेगळ्या कामासाठी किंवा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्या करता सुट्ट्या घेतल्या जातात असाही आक्षेप अलका कुबल यांनी घेतला आहे. तसेच परीक्षेचे कारणही तिच्याकडून अनेकदा सांगितले जातं. सध्या सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. मालिकेचे बहुतांशी कलाकार हे शूटिंग स्थळवरच वास्तव्यास आहेत. त्यामुळे सेटवर येण्यासाठी उशीर होतो हे कारण अगदीच तकलादू असल्याचा प्राजक्ताने मुद्दा मांडला आहे. यापूर्वी प्राजक्ताने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत येसूबाई ची भूमिका केली होती.

खरे तर याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यापूर्वी नांदा सौख्यभरे या मालिकेत अतिशय छोटीशी भूमिका होती. प्राजक्ता सध्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून तिने आई माझी काळुबाई ही मालिका सुरू होण्यापूर्वीच निर्माती अलका कुबल यांना तिच्या परीक्षेच्या बाबत सांगितले होते असे तिचे म्हणणे आहे. तर सध्याच्या काळात परीक्षा नसतानाही परीक्षेचे कारण देऊन शूटिंगला दांडी मारत असल्यामुळे अनेकदा शूटिंग थांबवण्याची वेळ आली असल्याचं अलका कुबल यांचं म्हणणं आहे. या दोघींच्या वादात अनेकदा मालिकेचे चित्रीकरण हे थांबलं होतं .

आता मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसणारी वीणा जगताप बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसली होती. या बिग बॉसच्या घरातच तिचे शिव ठाकरे सोबत प्रेम जमले आणि त्यांची जोडी इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गाजत आहे. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील राधा या मुख्य भूमिकेत विणा जगतापने अभिनय केला होता. आता वीणा आर्याची व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला लवकरच दिसणार आहे.

ही बातमी पण वाचा : स्पृहाने दिला चाहत्याला असाही मार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER