मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनवता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? नामांतरावरून नितेश राणेंची टीका

CM Uddhav Thackeray - Nitesh Rane

सिंधुदुर्ग :- औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच आता औरंगाबाद विमनतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यावरून भाजप (BJP) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीकास्त्र सोडले आहे.

“आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनवता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.

शिवसेनेवर (Shiv Sena) टीकेची एकही संधी न दवडणारे राणेंनी औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER