… तर मुख्यमंत्र्यांनी वर्षां निवासस्थानी निर्णय घेतले तर बिघडले कुठे? अजित पवार

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar - PM Narendra Modi

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट आहे . या गंभीर परिस्थितीचा आढावा न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपल्या निवासस्थानी बसून निर्णय घेत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केल्या जात आहे . विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) प्रतिउत्तर दिले आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नवी दिल्लीत बसून निर्णय घेतात, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां शासकीय निवासस्थानी निर्णय घेतले, तर बिघडले कुठे, असा सवाल अजित पवार यांनी भाजपला (BJP) विधानपरिषदेत केला.

पुरवणी मागण्यांवर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यातील प्रत्येक विभागाकडे बारीक लक्ष आहे. पंतप्रधानांप्रमाणे ते प्रत्येक विभागातील अधिकारी व संबंधितांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बोलून निर्णय घेत आहेत. करोनाचा मुकाबला राज्य सरकार समर्थपणे करीत आहे.

राज्याने गरजूंना अन्नधान्य व इतर मदत केली आहे.जनतेच्या मदतीसाठी गरज लागेल तेवढा निधी उभारू, असे पवार यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडून राज्याच्या हिश्श्याचे २२ हजार कोटी रूपये मिळालेले नाहीत. तरीही राज्य सरकार आपल्या निधीतून मोठी आर्थिक मदत देत आहे. जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ३२४४ कोटी रूपयांचा निधी मंगळवारीच वितरीत केला असून त्यापैकी ५० टक्के करोनासाठी आहे. केंद्र सरकार आता पीपीई किट, औषधे आदींसाठी निधी देणार नाही, तो भार राज्य सरकार उचलणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली .

ही बातमी पण वाचा : सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’; शिवसेनेचे टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER