….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन : चंद्रकांत पाटील

Ajit Pawar - Sharad Pawar - Chandrakant Patil

मुंबई :- मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) मांडलेल्या भूमिकेवरून भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. शांत राहण्याची संभाजीराजेंची भूमिका आपल्याला मान्य नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी संघर्ष केल्यास आपण शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठीशी उभे राहू, असा शब्द दिला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला सात वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची संभाजीराजेंची भूमिका असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून आहोत. संघर्ष करून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका शरद पवार, अजित पवारांची जरी असेल तर त्यांच्यामागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

मराठा आरक्षणावर संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “मराठा आरक्षण लगेच मिळण्यासाठी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सवलती मिळवण्यासाठी जो कोणी संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत…पण संघर्ष न करता, कोविड संपल्यावर मिळालं पाहिजे असं ते म्हणाले असून आम्हाला ते मान्य नाही. कोविडचा काय संबंध? सगळं जनजीवन सुरू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे. मग मराठा समाजाने कोविडचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत थांबायचं का? अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पुनर्विचार याचिका दाखल करा, दोन वर्षे  कायदा होता त्या काळातील तरुण, तरुणांना नोकरीचं पत्र द्या, आरक्षण मिळेपर्यंत सवलती द्या, मागास वर्ग नेमा या गोष्टी मी सांगितल्या असून त्याच गोष्टींचा पुनरुच्चार संभाजीराजेंनी केला आहे. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे; पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची, कोविडमुळे शांत बसण्याची असेल तर ती आम्हाला मान्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button