…तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन; कन्हैया कुमार यांचा व्हिडीओ व्हायरल

Kanhaiya Kumar

पाटणा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे.

मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन, असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. तसेच पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत, असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) हे जेव्हा काँग्रेसमध्ये (Congress) होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल… तर मी बोलेन की खबरदार… जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन, असं कन्हैया कुमार यांनी म्हटले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER