…म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला : संजय राठोड

Sanjay Rathod

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chauhan) आत्महत्याप्रकरणात समोर आलेले नाव वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी राजीनामा सुपूर्द केला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे सरकारला दिलासा मिळाला आहे. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशनात सरकारला बोलू देणार नाही, असा इशारा भाजपाकडून देण्यात आला होता.

उद्यापासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाणचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यावरून विरोधकांनी राज्यात अतिशय घाणेरडे राजकारण केले.” असे राठोड म्हणाले.

“पूजा चव्हाणप्रकरणात बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मला राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे. तसे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तपास होऊ द्या, त्यातून सत्य बाहेर येऊ द्या, अशी भूमिका मी आधीपासूनच केली होती. पण विरोधकांनी अधिवेशन चालू देणार असे इशारे दिले. म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.” असे राठोड यांनी माध्यमांना सांगितले.

राठोड यांना मुख्यमंत्री काय म्हणाले?

“पूजा चव्हाण प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. विरोधकांसोबतच स्वकीयांनीदेखील पक्षावर दबाव टाकला आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे तूर्तास राजीनामा द्या. आपण लवकरच निर्णय घेऊ. राजीनामा द्या. निर्दोष असाल तर पुढे विचार करू.” असे मुख्यमंत्र्यांनी वर्षा बैठकीत राठोड यांना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER