…तर लसीकरण होणार कसे? मोदी सरकारने उत्तर द्यावे; मलिकांचा केंद्राला सवाल

Nawab Mailk - Pm Modi - Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा अद्यापही कायम आहे. १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोदी सरकारवर (Modi Goverment) टीका केली.

“देशात अशी परिस्थिती  असतानाही ७० देशांना लस वाटण्याचे काम मोदींनी केले. कोरोनाबाबत नियोजनाचा अभाव आहे. पण घोषणा करण्याआधी यावर चर्चा होत नाही, नेमकी तयारी केली जात नाही. कोरोनाशी  लढण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. कोणतेही नियोजन न करता घोषणा केल्या जातात. राज्यांना लस पोहचवण्यात केंद्र अपयशी ठरले आहे. उद्यापासून लसीकरणाची घोषणा केली आहे; मात्र लसच नाही तर लसीकरण होणार कसे? सरकारला उत्तर द्यावे लागेल.” असे नवाब मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button