…म्हणून ‘सत्ते पे सत्ता’मध्ये हेमा मालिनी नायिका झाली !

Satte Pe Satta

राज सिप्पी यांनी जेव्हा ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली तेव्हा त्या काळची सुपरहिट जोडी अमिताभ (Amitabh) आणि रेखाला (Rekha) नायक- नायिकेच्या भूमिकांसाठी घेण्याचा निर्णय घेतला. अमिताभने तर लगेचच चित्रपटात काम करण्यास होकार दिला. याचे कारण म्हणजे सिप्पी कुटुंबीयांशी त्याचे चांगले संबंध होते. रेखाला जेव्हा नायिका बनवण्याचा विचार सुरू झाला तेव्हाच अमिताभ आणि रेखामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला होता. या दोघांनी एकत्र काम करणेही टाळले होते. अनेक चित्रपट या दोघांनी एकत्र भूमिका असलेले चित्रपट नाकारले होते. त्यामुळेच रेखाने ‘सत्ते पे सत्ता’मध्ये (Satta Pe Satta) काम करण्यास नकार दिला.

Quiz: Who was the first choice for Hema Malini's role in Satte Pe Satta? - Rediff.com movies यानंतर राज सिप्पी यांनी परवीन बाबीशी बोलणे सुरू केले. त्या काळात अमिताभ आणि परवीन बाबीची (Parveen Boby) जोडी प्रचंड लोकप्रिय होती. जया बच्चननंतर फक्त परवीन बाबीनेच अमिताभसोबत जास्त चित्रपट केले होते. परंतु परवीनही मानसिकदृष्ट्या खचली होती आणि यू. जी.  कृष्णमूर्ती आणि अध्यात्माकडे वळली होती. या दोन्ही नायिका मिळत नसल्याने अखेर हेमा मालिनीला (Hema Malini) घेण्याचा निर्णय राज सिप्पी यांनी घेतला. हेमा मालिनीचे तेव्हा धर्मेंद्रबरोबर (Dharmendra) लग्न झाले होते आणि त्याच वेळी तिच्याकडे काही चित्रपटही होते. अमिताभने सांगितले तर हेमा चित्रपटात काम करेल, असा विश्वास राज सिप्पी यांना होता. त्यांनी हेमा मालिनीला काम करण्याबाबत विचारण्यास अमिताभला सांगितले. अमिताभने विचारताच हेमा मालिनी काम करण्यास तयार झाली. मात्र जेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले तेव्हा हेमा मालिनी गरोदर होती. त्यामुळेच ‘परियों का मेला हैं…’ गाण्यात हेमा मालिनीला पोट दिसू नये म्हणून शाल लपेटून भाग घ्यावा लागला होता. ‘सत्ते पे सत्ता’ प्रदर्शित होण्यापूर्वीच हेमा मालिनी आई झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER