…तर लॉकडाउनच्या निर्णयाविरोधात टोकाची भूमिका घेणार नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे . लॉकडाउन (Lockdown) हा पर्याय नाही, मात्र नागपूरमध्ये सात दिवस लॉकडाउन केला आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावला पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही’ असे मत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संख्येवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला सोबत वॅक्सिनेशन वाढवण्याची गरज असल्याचे मागणी त्यांनी यावेळी केली.

नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या दोन तीन दिवसात मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. या अनुषंगाने नागपुरात आज पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही या बैठकीला आलो आहे. तात्काळ काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विशेषतः रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना रुग्णालयाची गरज आहे. त्यांना बेड्स उपलब्ध झाले पाहिजे रुग्णालयाच्या बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढं आलात, यावर तोडगा या बैठकीत काढला जाईल, जे काही जनतेसाठी करता येईल ते करू. लॉकडाउन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाउन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाउन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही असे देखील’, फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER