…तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या – आबासाहेब पाटलांचा आक्रमक पवित्रा

abasaheb patil

मुंबई :- मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. मराठा समाजाला SEBC तून आरक्षण देता येत नसेल तर ओबीसी (OBC) मधून द्या, अशी ठाम भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आबासाहेब पाटलांनी जाहीर केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आबासाहेब पाटील म्हणालेत, मराठा समाजाने SEBC चे आरक्षण मागितले आहे. EWS मध्ये आम्हाला घ्या, अशी आमची मुळीच मागणी नाही. सरकारला मराठा समाजाला SEBC आरक्षण देता येत नसेल तर OBC मधून द्या. EWS चा जो घाट घातलाय तो अत्यंत चूक आहे.

काही ओबीसी नेत्यांच्या सांगण्यावरून आज मराठा समाजाला EWS मध्ये ढकलायचे काम सरकार करते आहे. हे आम्ही सहन करणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समन्वयकांना घेऊन हे चर्चा करतात आणि सांगतात आमची सकारात्मक चर्चा झाली. या सकारात्मक चर्चेचा आणि आमचा काहीच संबंध नाही. आम्हाला आमच्या हक्काचं SEBC आरक्षण मिळालंच पाहिजे, असे आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) म्हणालेत.

सरकारने महिन्याभरापूर्वी जीआर काढला. मराठा SEBC च्या विद्यार्थ्यांनी खुल्या वर्गातून प्रवेश घ्याव. त्याची मुदत काल संपली. मुदत संपल्यानंतर आता तुम्ही EWS चे गाजर दाखवता. या EWS च्या आरक्षणाचा आमच्या विद्यार्थ्यांना कुठेही फायदा होणार नाही. आम्हाला EWS आरक्षण नको; आरक्षण द्यायचंच असेल तर SEBC किंवा ओबीसीतून द्या, अशी मागणी पाटलांनी केली.

काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु – अशोक चव्हाण

काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी बोलणारी लोक आहेत. निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा, अशी भूमिका घेतली जाते, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणालेत.

मराठा समाजाला EWSच्या सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तेव्हा संभाजीराजे, विनायक मेटे आणि काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय स्थगित ठेवला. मात्र, SEBCच्या उमेदवारांना EWSचा लाभ मिळावा म्हणून काहीजण कोर्टात गेले. उच्च न्यायालयाने १२ – १३ प्रकरणात EWSचे आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. EWS आरक्षणाचा कायदा आहे. त्याचा फायदा घेण्यापासून कसे रोखू शकतो? त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असे चव्हाण म्हणाले.

खासदार संभाजीराजे आक्रमक

आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचे म्हणत होतो. पण आता गडबड वाटते आहे. २५ जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखे वाटते आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जातो आहे का? असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारला.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार हतबल, EWS मधून मराठ्यांना आरक्षण नको ; शरद पवारांनी स्वतः लक्ष घालावं – संभाजी राजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER