म्हणून गांधींजी इतकेच ‘या’ अमेरिकन माणसाचे मानवतेवर उपकार आहेत!

Maharashtra Today

भांडवशाहीवादी अमेरिकेत जन्मलेल्या एका माणासाचं माणूसकीसाठीचं योगदान बुद्ध आणि गांधींच्या (Gandhiji)तोडीचं मानलं जातं. याला कारण ही तसंच आहे. न त्यांनी आध्यात्म अंगिकारलं होतं न आयुष्यावर त्यांनी कुठलं तत्त्वज्ञान मांडलं, तरी त्यांना इतका मोठा सन्मान का दिला जातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ‘नार्मन बोरलॉग’ (Norman Borlaug)नावच्या एका कृषी वैज्ञानिकामुळं भुकबळीसारख्या महाकाय समस्येवर मानवानं विजय मिळवला. गव्हाचं उत्पन्न

बोरलॉग यांचा जन्म अमेरिकेच्या ‘आयोवा'(Iowa) प्रांतात एका सामान्य कुटुंबात झाला. मिनेसोटा विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं. यावेळी त्यांनी गरिबांना अन्नाच्या अभवामुळं सहन करायला लागणाऱ्या त्रासाबद्दल समजून घेतलं.त्यांचा दाह बोरलॉग यांना समजून आला. त्यांचा अनूभवामुळं त्यांच्या मनात गरिबांबद्दल सहानभूती तयार झाली. गरिबांच्या भुकेचा प्रश्न मिटवण्यासाठी संभाव्य शक्यतांबद्दल ते विचार करु लागले. हा विचारच पुढं त्यांच्या अभ्यासाचा विषय बनला.

ड्यूपॉन्ट या रासायनिक खतं बनवणाऱ्या कंपनीत बोरलॉग यांना नोकरी लागली. त्यांनी १९४४मध्ये या कंपनीला रामराम ठोकला. ते मॅक्सिकोला आले. तिथं त्यांनी गव्हाच्या विकासासाठी काम करायला सुरुवात केली. कमी श्रमात आणि क्षेत्रात जास्त गहू उत्पादनाची घेता येईल याविषयी त्यांच संशोधन सुरु होतं. किडींना बळी न पडणारं गहू त्यांना तयार करायचं होतं. १९६३ पर्यंत त्यांनी संशोधन केलेल्या गव्हाचे उत्पन्न मॅक्सिकोच्या एकूण गव्हाच्या उत्पन्नापैकी ९५ टक्के होतं. मॅक्सिकोत गव्हाचं उत्पन्न इतकं वाढलं की गव्हाच्या दाण्यासाठी संघर्ष करणारा मॅक्सिको जगभरात गहू निर्यात करु लागला.

१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात दुष्काळ पडला. त्यावेळी नवी दिल्लीतल्या ‘भारतीय कृषी संशोधन संस्था’मध्ये एम. एस. स्वामीनाथन यांना बोललॉग यांच्याबद्दल कळालं, त्यांच्या कार्याची महती भारतात पोहचली होती. त्यांच्या आभ्यासपूर्ण संशोधनाचा भारताला फायदा होऊ शकतो याची कल्पना स्वामीनाथन यांना होती. त्यांनी बोरलॉग यांना भारतात बोलावलं.

त्यावेळी इंदिरा गांधई सरकारमध्ये अशोक मेहता हे योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. सरकारमधला दुसरा सर्वाधिक शक्तीशाली नेता अशी त्यांची ओळख होती. बोरलॉग यांनी भारतात आल्यानंतर त्यांची भेट घेतली. त्यांना कल्पाना होती की दुष्काळाच्या भीषण परिस्थीतीत काही बरं वाईट झालं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, म्हणून मेहता जातीनं बोरलॉग यांच्यासोबत उपस्थीत होते. बोरलॉग बोलायला घाबरत नसतं. सरकारच्या चुकीच्या धोरणांची ते स्पष्ट शब्दात निंदा करायचे.

सरकारी धोरणांविषयीचं त्यांच मत त्यांनी सर्वांसमोर मांडलं. बोरलॉग यांनी सांगितलेल्या गोष्टी सरकानं मनावर घेतल्या आणि शेतीत अमुलाग्र बदल घडवण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यांनी दिलेल्या धोरणांचा वापर करुन काही वर्षातच दुष्काळाची परिस्थीती आटोक्यात आली. बोरलॉग यांनी संशोधन करुन विकसीत केलेल्या गव्हानं भारतात मोठं व्यावसायिक यश कामावलं. १९९६ पर्यंत गव्हाचा आयातदार असणारा भारत गहू निर्यात करु लागला. पाच वर्षातच भारतात गव्हाचं उत्पन्न दुप्पट वाढलं.

बोरलॉग यांच्या नव्या वाणानं आणि शेतीच्या विकसीत पद्धतीमुळं आशियात भारत, पाकिस्तानसह इतर देशांना झाला. पाकिस्तान १९६५ ला ४६ लाख टन गव्हाचं उत्पन्न दरवर्षी घ्यायचा ते वाढून १९७० साली ८४ लाख टन इतकं वाढलं

२००६ साली भारताचा दुसरा सर्वात मोठा नागरिक सन्मान ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९६८ मध्ये त्यांची निवड ‘इंडीयन सोसायटी ऑफ जनेतेटीक अँड प्लांट ब्रिडींग’चे सदस्य म्हणून करण्यात आली. त्यांना एकूण ४८ पुरस्कारांनी वेगवेगळ्या देशांनी सन्मानित केलं होतं. इतर देशातही त्यांच काम प्रभावीपणे पोहचलं. त्यांना १९७० साली नोबेल पुरस्कार मिळाला होता.

२००९मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी अमेरिकेत त्यांच निधन झालं. आज ते या जगात नाहीत पण जगभरातल्या धान्यांमध्ये ते जिवंत आहेत. त्यांच्या संशोधनामुळं अनेकांच पोट भरतंय. मानवतेच्या कार्यात त्यांनी स्वतःला संत म्हणून नाही तर वैज्ञानिक म्हणून वाहून घेतलं. त्यांच्या प्रभावी कार्यपद्धतीमुळं भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button