छत्तीसगडच्या विजापूर येथील नक्षली हल्ल्यात २२ जवान शहीद

Naxal attack - Maharastra Today

विजापूर : छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत २२ जवानांना हौतात्म्य आलं आहे. दरम्यान, यापूर्वी छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीत कमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजी डी.एम. अवस्थी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २२ जवानांचं पार्थिव आतापर्यंत सापडल्याचं सांगण्यात येत आहे.

सुरक्षा दलावर नक्षलवादी संघटना पीपल्स लिबरेशन ग्रुप आर्मी प्लाटून वनच्या युनिटनं केला होता. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परंतु सुरक्षा दलाचे जवान ज्यावेळी आत शिरत होते त्याच वेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तीन प्रकारे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. सुरुवातीला बुले, त्यानंतर अन्य हत्यारं आणि रॉकेट लाँचरनं २००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आसामचा दौरा रद्द केलाय. अमित शहा हे आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर होते. आज त्यांच्या तीन प्रचार रॅली होणार होत्या; पण त्यातील एकच रॅली पार पडली. त्यानंतर पुढील कार्यक्रम रद्द करून शहा दिल्लीला परतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button