…यासाठी फडणवीस घाबरले, नवाब मलिकांचा फडणवीसांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis - Nawab Malik - Maharashtra Today

मुंबई : परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ शांत होत नाही तोवर फोन टॅपिंगवरुन जोरदार राजकारण रंगल्याच दिसत आहे. राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल आपण फोडलेला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तो अहवाल उघड केला. प्रसारमाध्यमांना त्यांनी तो उपलब्ध करुन दिला, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावर आता मलिकांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तो अहवाल लोकांच्या समोर सादर करणे हे माझ कर्तव्यच आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना नवाब मलिक यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती वर्षा निवासस्थान, मंत्रालय, मनपा कार्यालयात येत होती. राज्याचे अधिकारी भेटायचे. त्यात निरज गुंडेनं ट्वीट करुन या अहवालाबाबत सांगितलं. हा अहवाल दोन ठिकाणांहून फुटला. डीजीपी कार्यालय आणि निरज गुंडे यांनी हा अहवाल फोडला. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घाबरले असतील, असा टोला मलिकांना लगावलाय. आता फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते म्हणतात की मलिकांनी अहवाल फोडला. आम्ही तो अहवाल मांडला, आमचा तो अधिकार आहे, असंही मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या माध्यमातून कटकारस्थान रचत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला तेव्हा कुठलीही बदली झालेली नव्हती. फडणवीसांनी तो 6 जीबीचा डेटा दाखवावा. भाजप (BJP) सत्तेशिवाय राहूच शकत नाही. भाजपचे नेते आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत कटकारस्थान आखत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वावड्या उठवण्यात आल्या त्याचं काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल, असे सांगत आहेत, पण तसं काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्वास आहे, असा दावाही मलिकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER