… तर काँग्रेसने महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, दिग्विजय सिंहांच्या भावाची मागणी

Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या ‘लेटर बॉम्ब’ने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार गोत्यात आले आहे. आता मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh)यांचे बंधू लक्ष्मण सिंह (Laxman Singh) यांनी मागणी केलं आय – अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्यावरील आरोप खरे असल्यास काँग्रेसने महाविकास आघाडीला असलेले समर्थन मागे घ्यावे.

लक्ष्मण सिंह यांनी ट्वीट केले – महाराष्ट्राचे गृहमंत्री मुंबई पोलिसांकडून १०० कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणे वसूल करतात हे सत्य असेल तर देशमुख ‘देशाचे मुख’ होऊ शकत नाहीत. असे दिसते की आघाडी सरकार पिछाडीवर जाते आहे. काँग्रेसने आपले समर्थन माघारी घ्यायला हवे.

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंहांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर काँग्रेस हायकमांड ‘अ‍ॅक्टिव्ह’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER