…म्हणून मुख्यमंत्री ठाकरे लवकरच धार्मिक स्थळेही सुरू करणार, संबंधितांशी चर्चा सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - धार्मिक स्थळ

मुंबई : लॉकडाऊन (Lockdown) हटवा म्हणणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत का? असा थेट सवाल करणारे मुख्यमंत्री ठाकरे आता स्वतःच सर्व सुरू करण्याच्या तयारित आहेत. कालपासून राज्यातील रेस्टॉरंट (Restaurant) आणि बार (Bar) सुरू झाले. आता मंदिरे व इतर धार्मिक स्थळेही लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करीत असल्याची माहिती शिवसेनेचे (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांना दिली आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी सरकारवर विविध संघटना, संस्थानांचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे.

त्यामुळे यापुर्वी लॉकडाऊन उठवा, यावरील निर्बंध शिथिल करा, ते उघडा असे सल्ले देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमधून टोला लगावला आहे. लॉकडाऊन हटवा म्हणणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत का? असा रोखठोक सवाल करणारे उद्धव ठाकरे यांना हळूहळू सर्वच सुरू करणे भाग पडणार आहे.

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू झाले. पुनश्च हरिओम अंतर्गत सरकार हे करू शकते तर धार्मिक स्थळं का उघडत नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली होती.

रेस्टॉरन्ट, बार हे ५० टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे परंतु, धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणे शक्य नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री संबंधितांशी चर्चा करीत असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) मंदिरे (Temple) खुली करावीत, अशी मागणी भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती. मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटून मागणी रेटली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही मंदिर उघडण्यासाठी पंढरपूरमध्ये (Pandharpur) आंदोलन केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER