.. म्हणून भाजपाला संधी मिळावी – श्राबंती चॅटर्जी

Shravanti Chatterjee-PM MODI

कोलकाता : बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Shravanti Chatterjee) हिने १ मार्च रोजी भाजपात (BJP) प्रवेश केला. भाजपाचे समर्थन करताना ती म्हणाली की, मला वाटते की आमच्या ‘सोनार बाग्ला’चा विकास व्हायला हवा.

डाव्यांच्या आणि तृणमूलच्या शासनात बंगालचा जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला संधी मिळाली पाहिजे.

श्राबंती म्हणाली, मला तृणमूल काँग्रेसमधून कोणताही प्रस्ताव आला नाही. मी दीदींचा (ममता बॅनर्जी) आदर करते. दीदींसोबत मी एकाच व्यासपीठावर राहिली आहे. त्यांच्यासोबत प्रचारसाठीही गेलेय, पण मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते.

तिने ट्विट केले – पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे डाव्या पक्षाने आणि १० वर्ष तृणमूल काँग्रेसने सत्ता चालवली आहे. पण जितका विकास बंगालमध्ये व्हायला हवा होता, तितका तो झालेला नाही. मला वाटत आमच्या ‘सोनार बाग्ला’चा विकास व्हायला हवा. त्यामुळे मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER