म्हणून आई होण्यास नकार दिला अरुणा ईराणीने

Aruna Irani.jpg

बॉलिवूडमध्ये अरुणा इराणीने (Aruna Irani) व्हॅम्प आणि सहनायिका म्हणून अनेक चित्रपट केले. चित्रपटात नायिकेच्या बरोबरीची भूमिका अरुणा इराणी साकारीत असे. मेहमूदची आणि तिची जोडी चांगलीच जमली होती. प्रेक्षकांनाही या दोघांची जोडी खूपच आवडली होती. या दोघांनी लग्न केल्याचेही म्हटले होते. पण अरुणा इराणीने या संबंधांचा इन्कार केला होता. अरुणा इराणीने म्हटले होते, माझे मेहमूदबरोबर मैत्रीचे संबंध होते. आमच्यात दुसरे कसलेही संबंध नव्हते. मेहमदू एका मित्रापेक्षाही माझ्यासाठी जास्त होता. आमच्यात प्रेम असते तर आम्ही कधीही वेगळे झालो नसतो असेही अरुणा इराणीने म्हटले होते.

गेल्या सहा दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या अरुणा इराणीने 300 च्या आसपास चित्रपट केले. तसेच अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ऐन उमेदीच्या काळात कामात मग्न असल्याने अरुणा इराणीने लग्नाचा विचारच केला नाही. मात्र याच दरम्यान निर्माता दिग्दर्शक कुक्कू कोहलीबरोबर अरुणा इराणीचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न केले. कुक्कू कोहली यांचे अगोदरच लग्न झाले होते आणि त्यांना मुलेही होती. अरुणाला हे सर्व माहिती असतानाही तिने लग्न केले होते. मात्र जेव्हा लग्न केले तेव्हा अरुणा इराणीचे वय 40 होते. डॉक्टरांनी अरुणा इराणीला सांगितले होते, या वयात आई झाल्यास मुलात आणि तिच्यात वयाचे खूप अंतर राहील आणि जनरेसन गॅपचा प्रश्न निर्माण होईल. डॉक्टरांचे हे म्हणणे मला पटले आणि तेव्हाच मी आई न होण्याचा निर्णय घेतला असे अरुणा इराणीने एकदा बोलताना सांगितले होते. अरुणा इराणीला स्वतःच्या जीवनावर बायोपिक बनावा असे वाटते आणि तिची भूमिका आलिया भट्टने करावी असेही अरुणा इराणीला वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER