म्हणून अमिताभ बच्चन यांनी त्या दोघांना दिली सोन्याची चेन भेट

Amitabh Bachchan - Sanjay Dutt - Kumar Gaurav

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) प्रदर्शित होणारे जवळ जवळ सर्वच चित्रपट पाहातात. चित्रपटात एखाद्याचे काम आवडले की ते त्याला फोन करतात. त्याची प्रशंसा करतात आणि भेटवस्तूही देतात. अमिताभची ही सवय आजचीच आहे असे नाही तर पूर्वीपासूनच ते असे करीत आलेले आहेत. 1986 मध्ये राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) यांनी कुमार गौरवची सेकंड इनिंग सुरु करण्यासाठी नाम चित्रपटाची योजना तयार केली. चित्रपटात संजय दत्तलाही घेतले.

चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाच्या यशाचा कुमार गौरवला फायदा होता सगळे श्रेय संजय दत्तला (Sanjay Dutt) मिळाले. या चित्रपटामुळे संजय दत्तच्या कारकिर्दीने यशाच्या शिखराकडे वाटचाल सुरु केली. चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन संजय दत्त आणि कुमार गौरव यांच्या कामावर प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या दोघांनाही घरी जेवायला बोलावले. त्यांच्या कामाची प्रशंसा केली आणि एवढेच नव्हे तर दोघांनाही सोन्याची चेन भेट म्हणून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER