म्हणून आमिरने माधुरीसोबत डांस करण्यास नकार दिला होता

So Aamir had refused to dance with Madhuri

बॉलिवूडमधील नायिकांना चांगला डांस येणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळेच सिनेमात काम करायचे असले तर नायिका अगोदर डांस शिकून घेतात. मात्र सगळ्याच नायिका डांसमध्ये चांगल्या असतात असे नाही. काही नायिका फक्त सिनेमापुरते डांसचे शिक्षण घेतात आणि कोरियोग्राफरने सांगितलेल्या मूव्ज करून डांस करतात. बॉलिवुडमध्ये श्रीदेवी (Sridevi) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या अत्यंत उत्कृष्ट डांसर म्हणून ओळखल्या जातात. त्यातही माधुरी खूपच वरचढ आहे. आजही छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात माधुरी येते आणि ठुमके मारते तेव्हा अनेकांचे जीव नक्कीच घायाळ होतात.

माधुरीला डांसची आवड तिच्या आईमुळे झाली होती. माधुरीच्या आईला डांस आणि गाण्याची आवड होती. माधुरीच्या आईने माधुरीला लहानपणापासूनच डांसचे विधिवत शिक्षण दिले होते. माधुरीची मोठी बहिणही कथ्थक डांसर आहे. आई आणि मोठ्या बहिणीचे नृत्य पाहूनच माधुरीला डांसची आवड निर्माण झाली होती आणि दोन-तीन वर्षांची होती तेव्हापासूनच ती डांस करू लागली होती. एकदा दूरदर्शनवर मुलाखतीत बोलताना माधुरीने सांगितले होते, ‘मी बिरजू महाराजांची खूप मोठी फॅन आहे. एकदा अमेरिकेत बिरजू महाराजांचा परफॉर्मेंस होता. मी त्यांचा परफॉर्मन्स पाहिला आणि त्यांचा डांसचा वर्कशॉप डांस शिकण्यासाठी ज्वाईन करण्याचे ठरवले. मी जेव्हा त्यासाठी त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी, “तुला डांस शिकायचा आहे? असा प्रश्न केला. मी हो म्हटले असता त्यांनी मला म्हटले, “अगोदर मला ती तुझी एक, दो, तीनमध्ये तू बॅकवाली जी स्टेप केली होती ती कशी केली ती सांग मग मी तुला कथ्थक शिकवतो.” यावरून माधुरी किती चांगली डांसर होती हे दिसून येते.

त्यामुळेच माधुरीसोबत डांस करण्यास अनेक नायक तयार नसत. माधुरीसोबत डांस म्हटल्यानंतर नायक खूप वेळ रिहर्सल करीत असत. एकदा तर अनिल कपूरनेही (Anil Kapoor) माधुरीच्या डांसबद्दल बोलताना सांगितले होते, ‘आम्ही जेव्हा ‘राम लखन’ सिनेमाचा क्लायमॅक्स शूट करीत होता तेव्हा आमच्या दोघांवर एक गाणे चित्रित केले जात होते. त्यावेळेला माधुरीचा डांस पाहून मी थक्क झालो होतो.’’ आमिर खान (Aamir Khan) आणि माधुरीनेही अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे. ‘दिल’ सिनेमात आमिर आणि माधुरीवर ‘दम दमा दम’ गाणे शूट करण्यात आले होते. हे गाणे सुपरहिटही झाले होते. या गाण्यात अनेक कठिण स्टेप्स होत्या मात्र माधुरी त्या स्टेप्स लिलया करीत होती. आमिर खानला माधुरीचा डांस माहित असल्याने तो हे गाणे करण्यास तयार नव्हता. पण नंतर त्याने ते गाणे केले. एका मुलाखतीत त्याने स्वतःच ही गोष्ट सांगितली होती. तो म्हणाला होता, ‘मला हे गाणे करू नये असे वाटत होते. माधुरी माझ्यापेक्षा जास्त चांगली नाचते त्यामुळे मी असे गाणे का करू ज्यात माधुरी माझ्यापेक्षा जास्त चांगला डांस करणार असेल. आ बैल मुझे मार सारखी परिस्थिती होती. मी अगोदर गाणे न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिग्दर्शक इंद्र कुमारने माझी समजूत काढली आणि त्यानंतरच मी ते गाणे करण्यास तयार झालो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER