…म्हणून आंदोलनातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी निघून गेले आहेत – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- केंद्र सरकारच्या जाचक नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं गेल्या ४७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली .

सुरुवातीच्या काळात या आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर होते, परंतु आता शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतकऱ्यांच्यादेखील हे लक्षात आलं आहे की, केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललेच पाहिजे, या हेतूने काही लोक ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे यांनी शेतकऱ्यांची बाजू कोर्टात मांडली. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक बैठकी पार पडल्या. परंतु, या बैठकींमध्ये शेतकरी आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही.

केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानंही कडक भूमिका घेतलीय. केंद्र सरकारनं या कायद्यांना स्थगिती द्यावी अन्यथा सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देण्यात येईल, असेही सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER