जोशी मठजवळ हिमकडा कोसळला; लष्काराला सीमाभागाशी जोडणारा पूल तुटला

Joshimath Flood

जोशी मठ :- उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशी मठ (Joshimath) परिसरात रविवारी सकाळी हिमकडा कोसळल्याने रैनी गावात मोठे नुकसान झाले. महत्त्वाचे म्हणजे यात धौलीगंगेवरील सीमेकडील रस्त्यांना जोडणारा पूल वाहून गेल्यानं लष्काराचा मार्ग बंद झाला व ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प उद्धस्त झाल्याचे कळते.

रविवारी नंदादेवी हिमनगाचा कडा कोसळल्यानं धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांना पुर आला. या पुराने उत्तराखंडमध्ये २०१३ साली आलेल्या प्रलयाची आठवण करून दिली पाण्याच्या तडाख्यात ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे नुकसान झाले. दोन पूल तुटले आहेत. यातील एक पूल लष्कराला सीमाभागाशी जोडणारा आहे.

सीमाभागातील मलारीला जोडणारा पूल हिमकडा कोसळल्याने वाहून गेला. हा पूल लष्काराला सीमाभागांशी जोडतो. पूल वाहून गेल्यामुळे लष्कराने आयटीबीपीच्या २०० जवानांना जोशी मठात पाठवले आहे. आटीबीपीची एक टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. पूल बांधणारे लष्कराचे पथकही पाठवण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर गृहमंत्रालयाकडून नजर ठेवली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER