स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या शंकेला दिले उत्तर; मदत पोहचली आहे

दिल्ली : कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात मदत म्हणून जगातून आरोग्यासंबंधी साधनांची मदत मिळते आहे. ही मदत गरजवंतांकडे पोहचते आहे की नाही, अशी शंका  व्यक्त करणारे ट्विट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी केले होते. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी राहुल यांना उत्तर दिले – “तुम्ही ट्विट  करण्याआधीच मदत पोहचली आहे.”

भारतात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला? त्या गोष्टी कुठे आहेत? त्याचा फायदा कोणाला होतो आहे? त्यांचे राज्यांना कशा पद्धतीने वाटप झाले  आहे? या सगळ्यात पारदर्शकता का नाही?  असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले होते. त्यावर “तुम्ही ट्विट करण्याआधीच मदत पोहचली आहे. ” असे उत्तर स्मृती इराणींनी राहुल गांधींना ट्विटरने  दिले. राहुल गांधी यांना  टोमणा मारताना स्मृती इराणी म्हणाल्यात, राजकारणातून वर येण्याची वेळ आली आहे.

राहुलजी, ३१ राज्यांतील ३८ संस्थांना केलेल्या वितरणाची माहिती पब्लिक डोमेनवर आपल्या ट्विटच्या आधीपासून उपलब्ध होती. तुम्ही सत्याची चिंता करत असला तर ही माहिती शेअर करा. स्मृती इराणी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सरकारचे एक प्रसिद्धिपत्रकही शेअर केले आहे. यामध्ये कोणत्या राज्यातील कोणत्या हॉस्पिटलला परदेशातून आलेली मदत पाठवली आहे याची माहिती दिली आहे. हे पत्रक ४ मे रोजी प्रसिद्ध झाले होते. राहुल गाधींनी ५ मे रोजी केलेल्या ट्विटमध्ये परदेशातून आलेल्या मदतीबाबत सरकारला प्रश्न विचारले होते.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button