तिरथ सिंह रावतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर स्मृती इराणी भडकल्या!

Smriti Irani - Tirath Singh Rawat - Maharastra Today

नवी दिल्ली :- फाटलेल्या जिन्सबाबत विधान करणारे उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत या चर्चेत आहे. या विधानावर अनेकांनी त्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, तर अनेकांनी चांगलंच ट्रोल केले. यावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावतांच्या या विधानावर स्मृती इराणी भडकल्या आहेत.

स्मृती इराणी म्हणाल्या की, “लोकांनी कशाप्रकराचे कपडे घालावेत या सोबत नेत्यांचे काही घेणे देणे नाही. कारण त्यांचे काम धोरण बनविणे आणि कायद्याचे राज्य सुनिश्चित करणे आहे. काही गोष्टी पवित्र आहेत आणि त्यातलीच एक आहे. महिलांनी आपले जीवन जगण्याची पद्धत निवडणे आणि समाजासोबत जोडण्यासाठी महिला जो प्रकार निवडेल तो पवित्रच आहे. या गोष्टीत नेत्यांचा काहीही संबंध नाही की, लोक कसे कपडे घालतात. काय खातात किंवा काय करतात. आपले काम धोरण बनवणे आहे आणि कायद्याचे शासन सुनिश्चित करणे आहे. अनेक नेते चुकीचे वक्तव्य करतात.”

तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) एका कार्यक्रमात म्हणाले की, “मी एकदा विमानाने प्रवास करत होतो. तेव्हा एक महिला माझ्या बाजूला बसली होती. जेव्हा मी त्या महिलेकडे पाहिले, तेव्हा तिची जीन्स गुडघ्यावर फाटलेली होती. ही महिला एनजीओ चालवते. फाटलेली जीन्स घालणारी महिला संस्कृतीला कसा जन्म देईल आणि मुलांना काय संस्कार देईल.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER