स्मिथच्या जोडीला वॉर्नर आला पण आपल्याकडे अश्विन आहे ना!

Smith-Warner

भारताविरुध्दच्या (India Vs Australia) तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि विल पुकोवस्की (Will pucovski) यांचा समावेश करण्यात आला आहे. 7 तारखेपासून हा सामना सिडनीत (Sydney) खेळला जाणार आहे. जो बर्नस् (Joe Burns) याला मात्र वगळण्यात आले आहे. स्टिव्ह स्मिथच्या जोडीला आता डेव्हिड वॉर्नर आल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण असेल का? कारण गोलंदाजीत इशांत शर्मा तर नव्हताच, मोहम्मद शामी व उमेश यादवसुध्दा बाद झाले आहेत. म्हणून चिंतेचे कारण पण…रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) असताना भारतीय संघाला चिंतेचे कारण नाही.

याचे कारण असे की, अश्विनने पहिल्या दोन्ही सामन्यात स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) तर फार काही त्रास देऊच दिलेला नाही आणि मागची कामगिरी पाहाता तो डेव्हिड वॉर्नरलाही भारी पडलाय.

डेव्हिड वॉर्नरची भारताविरुध्दच्या कसोटी सामन्यांतील कामगिरी पाहिली तर रविचंद्रन अश्विन संघात असताना त्याने भारताविरुध्द 27 डावात फक्त एक शतकीखेळी केली आहे मात्र अश्विन संघात नव्हता त्यावेळी मात्र त्याने तीन डावात तीन शतके केली आहेत. म्हणजेच अश्विनसमोर वॉर्नरची डाळ शिजलेली नाही. म्हणूनच सिडनी कसोटीत अश्विन संघात असताना समोर वॉर्नर असो वा स्मिथ, आपल्याला चिंता करायचे कारण नाही.

वॉर्नर वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झालेल्या स्नायूदुखीमुळे संघाबाहेरच आहे. तो मेलबोर्न कसोटीपर्यंत तंदुरुस्त होईल अशी आशा होती पण तसे झाले नाही. पुकोवस्की याला ऑस्ट्रेलिया अ आणि भारतादरम्यानच्या सामन्यात चेंडू लागला होता आणि तो कन्कशनमुळे संघाबाहेरच होता. तो आता सावरलेला दिसत असला तरी कन्कशनबाबतच्या निकषाद्वारे तो पात्र ठरला तरच सिडनी कसोटीत खेळू शकणार आहे.

दुसरीकडे जो बर्नस् भारताविरुध्द चार डावात केवळ 63 धावा करु शकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER