स्मार्टफोनच्या अति वापरामुळे येतात पिंपल्स

smart phone

स्मार्टफोन बाळगणे ही आता काळाची गरज आहे. हे जरी खरे असले तरी स्मार्टफोन पासून दोन हात लांब राहा. कारण हे तुमच्या चेहऱ्यासाठी घातक आहे. स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे चेहरयाच्या त्वचेवरील छिद्रातून हवेतील जीवाणू आत प्रवेश करतात. यामुळे चेहरयावर काळे डाग येण्याबरोबरच पिंपल्सही येतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. स्मार्टफोनमधून रोज हजारो जीवाणू आपल्या त्वचेतून शरीरात प्रवेश करत आहेत. मोबाईलवरुन बोलताना आपण तो चेहऱ्यायाजवळ ठेवूनच बोलत असतो. यामुळे गाल व कान यामधील चेहऱ्याच्या त्वचेशी त्याचा थेट संबंध येतो. त्यातच जर स्मार्टफोनवरील बोलणे पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लांबले तर मोबाईल गरम होतो. यामुळे त्वचेवरील छित्रे उघडतात आणि हवेतील जिवाणू आत प्रवेश करतात.

तसेच मोबाईल वरही धूळीचे असंख्य कण चिकटलेले असतात ते ही त्वचेला चिकटतात. मग चेहऱ्याला खाज सुटणे, काळे डाग पडणे, पिंपल्स येणे अशा त्वचेशी संबंधित समस्या सुरु होतात. ज्या व्यक्ती दिवसातून ३८ पेक्षा जास्तवेळ स्मार्टफोन हाताळतात. त्यांच्यात त्वचारोगाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. या पासून लांब राहायचे असल्यास आपला मोबाईल रोजच्या रोज स्वच्छ करणे गरजेचे आहे. यासाठी बाजारात मोबाईल क्लिनर मिळतात. त्याने मोबाईल साफ करावा. मोबाईल वरुन बोलताना शक्यतो हँण्डस फ्री चा वापर करावा. आणि शक्यतो मोबाईलवरुन बोलताना महत्त्वाचेच बोलावे. जेणेकरून तुमच्या त्वचेला कुठलीही हानी पोहचणार नाही.